Shreya Maskar
गरजेपेक्षा जास्त हेडफोन किंवा इअरफोनचा वापर केल्यास श्रवणयंत्रणेवर वाईट परिणाम होते. कालांतराने कमी ऐकू येते.
सतत इअरफोन लावून गाणी ऐकल्यास कान सुन्न होतात. डोके बधीर होते. कानाच्या पडद्याला देखील त्रास होतो.
इअरफोनवर सतत गाणी ऐकल्याचा हृदयाचे आरोग्य बिघडते. हार्ट रेटवर त्याचा परिणाम होतो. ज्यामुळे हृदयाच्या समस्या उद्भवू शकतात.
इअरफोन सारखा कानाला लावल्याने कर्करोगाचा धोका देखील वाढतो. त्यामुळे सहसा जास्त इअरफोनचा वापर करणे टाळा.
इअरफोनमधील गाण्याच्या आवाजामुळे कानाचा पडदा कमकुवत होतो. तसेच तो फाटूही शकतो. तासनतास इअरफोन वापरल्याने कानात घाण साचते. ज्यामुळे बॅक्टेरिया निर्माण होतात.
सतत इअरफोन वापरल्याचे चक्कर येते. झोप पूर्ण होत नाही, भूक लागते. अशा अनेक शारिरीक समस्य उद्भवतात.
इअरफोन शेअरिंग केल्याने आपल्या कानात संसर्ग होण्याचा धोका खूप वाढतो. त्यामुळे आपले हेडफोन इतर कोणालाही देऊ नका.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.