Shreya Maskar
मेहंदी सुकल्यानंतर मेहंदीवर साखरेचे पाणी जरूर लावा. यामुळे मेहंदीला रंग गडद होतो. मेहंदी कमी वेळात चांगली रंगते.
एका वाटीत थोडे पाणी टाकून साखर विरघळवून घ्या. त्यानंतर कापसाच्या मदतीने पाणी मेहंदीच्या हातावर लावा. असे ३-४ वेळा करा.
मेहंदी रंगवण्यासाठी तुम्ही पेन किलर बामाचा देखील वापर करू शकता. बाममध्ये उष्णता असते. ज्यामुळे मेहंदी लवकर रंगते.
पॅनमध्ये ३-४ लवंगा गरम करून त्याचा जो धूर येईल त्यावर मेहंदीचा हात शेकवा. हा पारंपरिक उपाय आहे. यामुळे मेहंदीला वासही चांगला येतो.
लवंगाच्या धुरामुळे मेहंदीला काळा कुळकुळीत रंग येईल. तसेच मेहंदी दीर्घकाळ हातावर राहील. लवकरच जाणार नाही.
मेहंदी रंगण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे, हातावर नारळ तेल चोळा. यामुळे हात मऊ होतात आणि मेहंदी चांगली रंगते.
खायच्या पानाला लावला जाणारा काथा सुकलेल्या मेहंदीवर लावा. पटकन मेहंदीला लाल रंग चढेल.
चहापतीचे पाणी मेहंदीवर शिंपडा. यामुळे मेहंदी पटकन रंगते. तसेच तुम्ही लिंबाचा रस हाताला लावा किंवा त्याची साल हातावर चोळा.