Shreya Maskar
पावसाळ्यात प्रवासा करताना आणि ट्रेन पकडताना स्वतःची काळजी घेणे खूपच गरजेचे आहे.
पावसाळ्यात धावती ट्रेन पकडणे टाका. कारण ट्रेनचे दरवाजावर पाणी असते ज्यामुळे हात सटकण्याची भीती वाढते.
पावसाळ्यात आवर्जून पावसाळी बुटं वापरा. यामुळे पावसाळ्यात चालणे सोयीचे होते.
विशेषता पावसाळ्यात ट्रेन पकडताना बॅग समोर पकडा. जेणेकरून तुम्हाला नीट चढता येईल. बॅग कायम पोटाजवळ ठेवा.
पावसाळ्यात छत्रीपेक्षा रेनकोटचा वापर जास्त करा.
रेनकोट घालून तुम्ही सहज ट्रेनमध्ये देखील चढू शकता.
पावसाळ्यात कायम जवळ जास्तीचा रुमाल ठेवा. यामुळे तुम्ही ट्रेनची ओली सीट पुसून सहज बसू शकता.
पावसाळ्यात बाहेर जाताना वेळेच्या थोड आधीच घरातून निघा. जेणेकरून पुढे घाई होणार नाही.