Shreya Maskar
पावसाळ्यात चष्मा पुसण्यासाठी कायमसोबत सुती कपडा ठेवा.
पावसाच्या वातावरणामुळे चष्मा चिकट होतो. अशावेळी तो चष्मा साफ करण्याच्या लिक्विडने स्वच्छ करा.
पावसाळ्यात आवर्जून चष्म्याचा बॉक्स सोबत ठेवा. जेणेकरून प्रवासात चष्मा सुरक्षित राहील.
पावसाळ्यात प्रवास करताना चष्मा हरवण्याचे किंवा खराब होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे एक साधा चष्मा सोबत ठेवा.
चष्म्याची फ्रेम पावसाळ्यात घाईघाईत आपल्या कपड्यांनी पुसू नये. कारण आपल्या कपड्यांवर धुळीचे अनेक कण असतात.
आपल्या कपड्यांनी चष्मा पुसल्यास तो लवकर खराब होण्याची शक्यता असते.
चष्मा पुसताना कधीही काच रगडू नये. त्यामुळे काचेवर ओरखडे पडू शकतात.
पावसाळ्यात थोडा जरी चष्मा सैल वाटत असेल तर त्वरित दुरूस्त करून घ्या. नाहीतर तो प्रवासात पडेल.