Pune Tourism : मराठ्यांच्या शौर्याचे साक्षीदार पुण्यातील 'हे' ८ किल्ले, करा इतिहासाची उजळणी

Shreya Maskar

सिंहगड

सिंहगड किल्ल्याला कोंढाणा किल्ला असे ही म्हणतात. हा किल्ला तानाजी मालुसरे यांनी जिंकला. हे तानाजी मालुसरे यांच्या शौर्य आणि बलिदानाचे प्रतीक आहे.

fort | google

राजगड किल्ला

राजगड किल्ला पुण्यातील भोर तालुक्यात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी होती. येथून निसर्गाचा सुंदर नजारा दिसतो.

fort | google

तोरणा किल्ला

तोरणा किल्ला प्रचंडगड या नावाने देखील ओळखला जातो. हा देखील भोर तालुक्यात आहे. 1643 मध्ये शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला होय.

fort | google

शिवनेरी किल्ला

पुण्यात जुन्नर तालुक्यात शिवनेरी किल्ला वसलेला आहे. येथे देवीचे मंदिर आहे. पुण्यात गेल्यावर हे ठिकाण पाहायला अजिबात विसरू नका.

fort | google

पुरंदर किल्ला

पुण्यात सासवडजवळ पुरंदर किल्ला आहे. 1665 चा पुरंदरचा तह येथे झाला. मराठा–मुघल संघर्ष येथे घडला.

fort | google

लोहगड किल्ला

पुण्यात मावळ तालुक्यात लोहगड किल्ला वसलेला आहे. सुरतेच्या लुटीचा खजिना येथे ठेवण्यात आला होता. हे ट्रेकिंगसाठी उत्तम ठिकाण आहे.

fort | google

विसापूर किल्ला

विसापूर किल्ला हा लोहगडजवळ आहे. पेशव्यांच्या काळात यांची बांधणी झाली आहे. मोठे पठार, तोफा, पाण्याची टाकी येथे पाहायला मिळते. हे ठिकाण ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे.

fort | google

जीवधन किल्ला

पुण्यात नाणेघाट परिसरात जीवधन किल्ला वसलेला आहे. अवघड चढाई येथे पाहायला मिळते.

fort | google

NEXT : निसर्ग, संस्कृती अन् चहाच्या सुगंधाने बहरलेले शहर, 'येथे' पाहाल सुंदर नजारा, आताच ट्रिप प्लान करा

Winter Picnic Spot | google
येथे क्लिक करा...