Mumbai Tourism : मुंबईतील किल्ल्यांमधून डोकावणारा इतिहास, वीकेंडला एक्सप्लोर कराच 'हे' ८ Hidden Gems

Shreya Maskar

माहिम किल्ला

मुंबईत माहिम येथे माहिम किल्ला वसलेला आहे. हा एक सागरी किल्ला आहे. जो 13व्या शतकात राजा भीमदेव याने बांधला असे बोले जाते. वरळी, बांद्रा आणि माहिम या भागांवर नजर ठेवण्यासाठी महत्त्वाचा ठरला.

Fort | google

वरळी किल्ला

वरळी किल्ला अंदाजे 1675 मध्ये ब्रिटिशांनी बांधला. समुद्रातून येणाऱ्या शत्रू जहाजांवर लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जात होता. किल्ल्यात विहीर व मंदिर आहे. येथून माहिम खाडीचे सुंदर दृश्य दिसते.

Fort | google

वांद्रे किल्ला

वांद्रे किल्ला 1640 मध्ये पोर्तुगीजांनी बांधला. येथून अरबी समुद्र आणि बांद्रा-वर्ली सी-लिंकचे सुंदर दृश्य पाहायला मिळते.

Fort | google

सायन किल्ला

सायन किल्ल्याचा उद्देश असा होता की, ब्रिटिश आणि पोर्तुगीज प्रदेशांची सीमा निश्चित करणे. किल्ल्याचे बांधकाम 1669–1677 ब्रिटिश गव्हर्नर जेराल्ड ऑंगियर यांच्या काळात झाले.

Fort | google

शिवडी किल्ला

शिवडी किल्ला मुंबईतील शिवडी येथे आहे. यांचे बांधकाम ब्रिटिशांनी 1680 मध्ये केले. मुंबई बंदरावर नजर ठेवणे हा शिवडी किल्ल्याचा उद्देश होता.

Fort | google

माझगाव किल्ला

माझगाव किल्ला ब्रिटिशांनी सुमारे 1680 ला बांधला असावा. सुरक्षेच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा भाग होता.

Fort | google

फोर्ट जॉर्ज

ब्रिटीशांनी बॉम्बे कॅसलभोवती ही भक्कम तटबंदी उभारली होती. दक्षिण मुंबईच्या फोर्ट परिसरात हा किल्ला आहे. हे ब्रिटिश प्रशासनाचे प्रमुख केंद्र होते.

fort | google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

fort | google

NEXT : रिमझिम पावसाच्या सरी अन् कोकण ट्रिप, 'वालावल'मधील निसर्गसौंदर्य पर्यटकांना खुणावते

konkan Tourism | yandex
येथे क्लिक करा...