Shreya Maskar
फ्रीजमध्ये अन्न ठेवण्याआधी काही गोष्टींची विशेष काळजी घ्या. कोणते पदार्थ किती वेळ फ्रीजमध्ये सुरक्षित राहतात, जाणून घेऊयात.
फ्रीजमध्ये जास्तीत जास्त 3-4 दिवसांपर्यंत भाजीपाला ठेवा. तो चांगला ताजा राहतो.
शिजवलेला भात 1-2 दिवसांच्या आत खा. नाहीतर तो खराब होतो.
फ्रीजमध्ये चपाती ठेवली असेल तर 12-14 तासांच्या आत खा. नाहीतर ती कडक होते.
शिजवलेले मांस आणि मासे 1-2 दिवसांत खावे. जास्त काळ ठेवल्यास विषबाधा होण्याची शक्यता असते.
दुग्धजन्य पदार्थ जास्तीत जास्त 5-5 दिवस फ्रिजमध्ये फ्रेश राहतात.
अंडी 3-4 आठवड्यांपर्यंत फ्रीजमध्ये ठेवून शकता.
फ्रीजमध्ये कोणताही पदार्थ ठेवताना हवाबंद डब्याचा वापर करा. जेणेकरून अन्न खराब होणार नाही.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.