Shreya Maskar
कर्नाळा हे मुंबईजवळील ट्रेकिंग, पक्षीनिरीक्षण आणि निसर्गप्रेमींसाठी उत्तम ठिकाण आहे. येथे कर्नाळा किल्ला आणि कर्नाळा पक्षी अभयारण्य पाहायला मिळते.
तारकर्ली बीच स्वच्छ पांढऱ्या वाळूसाठी, निळ्याशार शांत पाण्यासाठी आणि जलक्रीडा यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. तारकर्ली हे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात, मालवण तालुक्यात असलेले एक सुंदर गाव आहे. जे कार्ली नदी आणि अरबी समुद्राच्या संगमावर वसलेले आहे.
रत्नागिरी हे कोकणातील एक अत्यंत नयनरम्य ठिकाण आहे. येथे सुंदर धबधबे, अंथाग समुद्रकिनारे पाहायला मिळतात. येथे तुम्हाला शांत वातावरण अनुभवता येईल.
अलिबाग हे 'मिनी-गोवा' म्हणून प्रसिद्ध आहे. येथे वॉटर स्पोर्ट्सची मजा घेता येते. सूर्योदय आणि सूर्यास्ताचे सुंदर दृश्य पाहायला मिळते.
माळशेज घाट हा महाराष्ट्रातील रोड ट्रिपसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. धबधबे, हिरवीगार दरी आणि निसर्गरम्य दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे.
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर हे हिवाळ्यात फिरण्यासाठी उत्कृष्ट ठिकाणे आहेत. तुम्ही येथे भन्नाट फोटोशूट करू शकता. त्यामुळे कुटुंबासोबत येथे नक्की भेट द्या.
नवीन वर्षात मित्रांसोबत आवर्जून लोणावळा - खंडाळा येथे रोड ट्रीप करा. येथे धबधब्याचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. तसेच हे ठिकाण वन डे ट्रिपसाठी देखील उत्तम आहे.
अजिंठा-वेरूळची लेणी औरंगाबादजवळ आहेत.अद्भुत दगडी कोरीव काम येथे पाहायला मिळते. तसेच येथे अनेक गुहा आणि मंदिरे देखील आहेत.