Saam Tv
मे महिना हा मित्र-मैत्रिणी, आई-बाबा किंवा सगळ्यांसाठीच सुट्ट्यांचा महिना मानला जातो.
तुम्ही मे महिन्यात फॅमिलीसोबत इंडिया फिरण्याचा प्लान करत असाल तर पुढील ठिकाणे एकदा नक्की पाहा.
ब्रह्मपुत्रेच्या मध्यभागी वसलेले हे बेट सगळ्यात प्रसिद्ध आहे. इथे मंदिरे , पर्यटकांसाठी विविध कथांचे प्रदर्षण, आणि भाताच्या शेतीवर आलेला सुर्य सगळे पाहू शकता.
मेघालयाच्या टेकड्यांमध्ये वसलेले हे एक छोटेसे गाव आहे. तिथे तुम्ही खरं जंगल सुंदर तलाव, लांब लचक झाडं अशा गोष्टी अनुभवू शकता.
लहान शहर विविध मंदिरे, थंडगार वस्ती, झाडं, विविध नागमोडी वळणे असे सुंदर शहर पाहण्यासाठी तुम्ही उखीमठला जावू शकता.
तवांगमध्ये मठ, माधुरी तलाव, नुरनांग धबधबा आणि सेला खिंड अशी मजा उन्हाळ्यात घेऊ शकता.
दांडेली या पश्चिम भागातील सुंदर आणि लहान शहरात तुम्ही अभयारण्य, काली नदी, सुपा धरण अशा सगळ्या ठिकाणांना भेट देऊ शकता.
ऐतिहासिक ठिकाणे पाहण्याचा प्लान असेल तर हंप्पी हा सगळ्यात बेस्ट पर्याय असेल.
गंगा नदीच्या किनारी वसलेले ऋषिकेश हे हिमालयाच्या पायथ्याशी आहे. इथे तुम्ही योगा आणि मेडीटेशन सेंटर्स, त्रिवेणी घाट अशा विविध ठिकाणांना भेट देऊ शकता.