Silver Anklet Designs: 1 वर्षाच्या बाळासाठी ओरिजनल सिल्व्हर अँकलेटचे सहा शानदार प्रकार

Bharat Jadhav

बाळासाठी चांदीचे पैंजण

स्वस्त दरात नवजात बाळासाठी चांदीचे पैंजण उपलब्ध आहेत, तेही ओरिजनल सिल्व्हर अँकलेटचे सुंदर डिझाइन्समध्ये आहेत.

ॲपल चार्म सिल्व्हर अँकलेट

या अँकलेट्समध्ये लहान ॲपल, हार्ट, स्टार किंवा फ्लॉवर चार्म्स लावलेले असतात. हे गिफ्ट देण्यासाठी खूप योग्य पर्याय आहे.

ॲडजस्टेबल चेन सिल्व्हर अँकलेट

नवजात बाळांची वाढ वेगाने होत असते. त्यामुळे हे ॲडजस्टेबल चेन सिल्व्हर अँकलेट डिझाइन खूप छान आहेत. याचा आकार आपल्याला ॲडजस्ट करता येतो.

ब्लॅक बीड सिल्व्हर पैंजण

या डिझाइनमध्ये सिल्व्हर चेनसोबत लहान काळे मणी लावलेले आहेत. जे वाईट नजरेपासून बाळाचे संरक्षण करतील. हे अँकलेट मॉडर्न लुक असणारे आहे.

टॅसल्स वर्क सिल्व्हर अँकलेट

यात चांदीला हलके टॅसल्स वर्क केलेले असते. तसेच मोटिफ्स पॅटर्न लटकवलेले असतात. हे दिसण्यास खूप युनिक दिसतात.

प्लेन सिल्व्हर अँकलेट

यात कोणताही अतिरिक्त भाग नसतो, ज्यामुळे नवजात बाळाला आराम मिळतो. हे अगदी सोपे डिझाइन आहे. 0-3 महिन्यांच्या बाळांसाठी रोजच्या वापरासाठी हे छान आहे.

घुंगरू असलेले चांदीचे पैंजण

या डिझाइनमध्ये खूप लहान आणि हलके घुंगरू लावलेले असतात. बाळाच्या हालचालीवर एक मंद आवाज येत असतो.

हेही वाचा

येथे क्लिक करा

महिलांचा डावा डोळा फडफडत असेल तर? नेमके काय संकेत मिळतात?