ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताकडून सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे.
रोहित शर्माने आतापर्यंत एकूण 273 एकदिवसीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 265 डावांमध्ये 344 षटकार मारले आहेत.
महेंद्रसिंग धोनीचे नाव यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
धोनीने 347 सामन्यांच्या 294 डावांमध्ये एकूण 222 षटकार मारले आहेत.
सचिन तेंडुलकरचे नाव यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. 463 सामन्यांच्या 452 डावांमध्ये 195 षटकार मारले आहेत.
सौरव गांगुलीने 308 सामन्यांच्या 297 डावांमध्ये 189 षटकार मारुन यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.
यादीत पाचव्या क्रमांकावर युवराज सिंगचे नाव आहे. त्याने 301 सामन्यांच्या 275 डावांमध्ये 153 षटकार मारले आहेत.
विराट काोहली या यादित सहाव्या क्रमांकावर आहे. त्याने त्याच्या आतापर्यंतच्या करियरमध्ये 302 एकदिवसीय सामन्यांमध्ये 290 डावांमध्ये 152 षटकार मारले आहेत.