ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गर्भधारणा हा एक असा प्रवास आहे जो प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील सर्वात खास क्षण असतो. या काळात महिलांना विशेष काळजीची आवश्यकता असते.
गरोदरपणात थकवा येणे सामान्य आहे, म्हणून गरजेनुसार तुमचे ऑफिस वेळापत्रक समायोजित करणे.
दर १-२ तासांनी ५-१० मिनिटे चाला किंवा स्ट्रेचिंग करा. यामुळे रक्ताभिसरण सुधारेल.
गरोदरपणात महिलांनी भरपूर पाणी प्यावे किंवा ज्यात पाणी असले अशी फळे प्यावी.
कामाचा ताण असेल तर तुमच्या बॉसशी बोला. गरोदरपणात मानसिक आरोग्य महत्वाचे आहे, अन्यथा त्याचा परिणाम तुमच्या बाळावरही होऊ शकतो.
कामाच्या दिवसानंतर ७-८ तासांची झोप तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी फायदेशीर आहे. म्हणून पुरेशी झोप घ्या.
जास्त वेळ बसल्याने पाठदुखी होऊ शकते, म्हणून एर्गोनॉमिक खुर्ची वापरा आणि सरळ बसा.