Shreya Maskar
उन्हाळ्यात हलक्या आणि मऊसूत प्रकारची साडी नेसा. ज्यामुळे तुम्हाला जास्त गरम होणार आहे.
उन्हाळ्यात प्रामुख्याने कॉटन, लिनेन, शिफॉन आणि जॉर्जेटची साडी नेसा.
कॉटनच्या साडीमुळे घाम लवकर येत नाही आणि हवा देखील खेळती राहते.
लिनेन हा कपडा नैसर्गिक तंतूंपासून बनवलेला असतो. ज्यामुळे उन्हाळ्यात शरीराला आराम देतो.
शिफॉन साड्या हलक्या आणि पातळ असतात, त्यामुळे उन्हाळ्यात आवर्जून घाला.
जॉर्जेट साडी तुम्ही उन्हाळ्यात कोणत्याही कार्यक्रमाला घालून जाऊ शकता.
खादीची साडी हाताने विणलेल्या कापडापासून बनवलेली असते.
उन्हाळ्यात हलक्या रंगाची साडी नेसा. कारण हे रंग जास्त उष्णता शोषून घेत नाहीत.