Shreya Maskar
सर्व रंगांच्या काठापदराच्या साडीवर घालण्यासाठी पैठणी ब्लाउज हा बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही पैठणी साडीवरही हा ब्लाउज उठून दिसेल.
पैठणी ब्लाउज जवळपास सगळ्याच साडीवर मॅच होतो. कारण त्यात अनेक रंगांच्या छटा पाहायला मिळतात. तसेच तो सुंदर दिसतो.
पैठणी ब्लाउजचा काठ सोनेरी किंवा गुलाबी रंगाचा निवडा. हे रंग पैठणी साड्यांमध्ये सहज असतात. तसेच असे ब्लाउज तुम्हाला बाहेरही मिळतील.
तुम्ही पैठणी साडीचा देखील सुंदर ब्लाउज शिवू शकता. ब्लाउजच्या पाठीमागे नेट लावून त्यावर सुंदर मोराची नक्षीकाम करा. तुमचा लूक खूप उठून दिसेल. तसेच तुम्ही समोरून थोडा डीप नेक ब्लाउज बनवा.
डिझायनर साडीवर घालायला शिफॉन किंवा सिल्कचा ब्लाउज शिवा. तुम्ही याचा स्लीवलेस ब्लाउज किंवा बॅकलेस ब्लाउज शिवू शकता.
डिझायनर साडीचा ब्लाउज काळा, सोनेरी, चंदेरी , लाल रंगाचा शिवा. हे सर्व रंग कोणत्याही साडीवर चांगले दिसतील.
हाय-नेक, स्वीटहार्ट नेक, बोट नेक सारखे क्लासिक डिझाइन्स कोणत्याही साडीला स्टायलिश आणि एलिगंट लुक देतात.
नऊवारी साडीवर घालण्यासाठी लाल आणि हिरव्या रंगाचा एक स्टायलिश आणि एक साधा-सिंपल ज्यावर जास्त नक्षीकाम नसेल असा ब्लाउज शिवा.