Manasvi Choudhary
मंगळसूत्रामध्ये वाटी मंगळसूत्र हा पारंपारिक दागिना आहे. वाटी मंगळसूत्र हे सौभाग्याचे आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जाते.
पारंपरिक दागिन्यामध्ये अनेक आधुनिक आणि स्टायलिश बदल झाले आहेत. सध्या मंगळसूत्राचे लेटेस्ट पॅटर्न कोणते आहेत हे जाणून घ्या.
साध्या प्लेन वाट्यांऐवजी आता वाट्यांवर मोराचे किंवा फुलांचे कोरीव काम केले जाते. काठपदर साडी किंवा पैठणीवर हा लूक अत्यंत रॉयल दिसतो.
'डबल लेयर' मिनी वाटी यात वाट्यांचा आकार खूप लहान असतो आणि त्या एकाऐवजी दोन नाजूक काळ्या मण्यांच्या सरांमध्ये गुंफलेल्या असतात.
वाट्यांच्या खालच्या बाजूला सोन्याचे छोटे मणी किंवा नाजूक साखळ्या लटकवलेल्या असतात. हा मंगळसूत्राचा पॅटर्न थोडा स्टायलिश आहे.
सध्या चकचकीत पिवळ्या सोन्याऐवजी 'मॅट' सोन्याची मोठी क्रेझ आहे लिनन साडी किंवा सिल्क साड्यांवर हे उठून दिसते.
पारंपरिक कोल्हापुरी साज वाटी यात दोन वाट्यांच्या मध्ये मणी नसून नाजूक नक्षीकाम असते. वाट्यांच्या खाली छोटे सोन्याचे मणी किंवा घुंगरू जोडलेले असतात.