Manasvi Choudhary
साडी नेसल्यावर केस कसे बांधायचे असा प्रश्न सर्वच महिलांना पडतो मात्र तुम्हाला आज आम्ही साडीवर कोणती हेअरस्टाईल करावी हे सांगणार आहोत.
साडीवर तुम्ही ट्रेडिशनल आणि मॉडर्न लूकसाठी तुम्ही केसांची वेणी घालू शकता जे तुमचा लूक सुंदर बनवेल.
साडीवर तुम्ही खास केसांची वेणी बांधू शकता. केसांच्या सुरूवातीपासून तुम्ही वेणी घाला प्रत्येक स्टेपला बाजूचे केस त्यात मिळवले जातात.
केसांची वेणी स्टाईल ही ऑफिस वेअर, कुर्ती किंवा कॉलेजच्या मुलींसाठी ही बेस्ट स्टाईल आहे.
खजुरी वेणी केसांचे दोन भाग करून खूप बारीक बटा एकमेकांत गुंफल्या जातात, ज्यामुळे ती माशाच्या शेपटीसारखी दिसते. ही वेणी जितकी बारीक विणली जाईल, तितकी ती जास्त सुंदर दिसते.
बबल वेणी ही एक उंच पोनीटेल बांधून ठराविक अंतरावर रबर बँड्स लावले जातात आणि त्यामधील केस थोडे फुगवले जातात.
मेसी डच वेणी ही फ्रेंच वेणीसारखीच असते, पण यात बटा खालून वरच्या बाजूला विणल्या जातात, ज्यामुळे वेणी केसांच्या वर 'उठावदार' दिसते.
पारंपारिक वेणी विथ गजरा ही एकदम हटके स्टाईल आहे पैठणी, नऊवारी किंवा कोणत्याही सिल्क साडीसाठी हा 'परफेक्ट' लूक आहे.