Manasvi Choudhary
चेहऱ्यावरील डबल चिनमुळे चेहरा मोठा दिसतो. त्रास होता अशावेळी नेमके काय करायचे ते आज जाणून घेऊया.
नियमितपणे फेस योगा केल्याने मानेच्या आणि जबड्याच्या स्नायूंना व्यायाम मिळतो आणि तेथे साठलेली चरबी कमी होते.
सरळ समोर पाहून जीभ जितकी शक्य असेल तितकी बाहेर काढा आणि जीभ नाकाकडे नेण्याचा प्रयत्न करा यामुळे हनुवटीचे स्नायू ताणले जातात आणि तिथली त्वचा घट्ट होते.
हनुवटीखालील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी डोके मागे झुकवून वरती बघा नंतर खालचा जबडा शक्य तितका पुढे घ्या जेणेकरून हनुवटीखाली ताण जाणवेल. १० सेकंद या स्थितीत राहा.
हळूवारपणे तुमची हनुवटी छातीला टेकवा आणि नंतर हळूहळू मान गोलाकार फिरवा यामुळे मानेची लवचिकता वाढते आणि मानेभोवतीची चरबी कमी होते.
ताठ बसा. सतत मान झुकवून मोबाईल पाहिल्यामुळेही डबल चिनची समस्या वाढते
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.