Shreya Maskar
राग आवरण्यासाठी सर्वप्रथम सुरू असलेल्या परिस्थिती/क्षणापासून दूर जा. म्हणजे वाईट गोष्टी सतत तुमच्या डोळ्यासमोर येणार नाही.
राग कंट्रोल करण्यासाठी हळूहळू श्वास घ्या आणि श्वासावर लक्ष केंद्रित करा.
श्वासावर लक्ष केंद्रित केल्यावर मन शांत होते आणि तणाव कमी होतो.
रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी रोज योगा आणि व्यायाम करून स्वतःला शांत करा.
सकारात्मक पुस्तके वाचा म्हणजे रागाच्या वेळी सकारात्मक विचार डोक्यात येतील.
रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी छंद जोपासा आणि त्यात जास्तीत जास्त वेळ घालवा.
छंद जोपासल्यामुळे रागावरून लक्ष विचलित होते आणि मन कामात गुंतलेले राहते.
झोपेचा अभाव हे देखील रागाचे कारण असू शकते. त्यामुळे नियमित पुरेशी झोप घ्या.