Shreya Maskar
भात पातेल्यात शिजवल्यावर शरीराला अधिक जास्त पोषण मिळते.
भात शिजवण्याआधी २-३ वेळा कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
त्यानंतर १५ -२० मिनिटे तांदूळ पाण्यात भिजत ठेवा.
आता मोठ्या भांड्यात तांदूळ भिजेल एवढे पाणी टाकून तांदूळ शिजायला ठेवा.
तांदळामध्ये अर्धा चमचा तूप टाका. ज्यामुळे भात मोकळा होतो.
भात शिजवताना गॅस कायम मंद आचेवर ठेवावा. म्हणजे तो पातेल्याला चिकटणार नाही.
भाताची चव वाढवण्यासाठी त्यात वेलची, तमालपत्र टाकू शकता.
तांदूळ कधीही चांगल्या क्वालिटीचा खरेदी करावा. जेणेकरून तो नीट शिजतो.