Shreya Maskar
लोणच्याला विचित्र वास येत असेल. लोणच्याला बुरशी लागली असेल तर सर्वप्रथम बुरशी लागलेले लोणच्याचा भाग वेगळा करा.
उरलेले लोणचे चांगले नवीन स्वच्छ काचेच्या बरणीत काढून ठेवा. मात्र त्याआधी लोणच्यात तेलाचे गरम मोहन टाका.
संपूर्ण बरणीला बुरशी लागली असेल तर वरच्यावर चांगले लोणचे काढून घ्या. बाकीचे फेकून द्या. लोणचे मिक्स करू नका.
लोणच्याला बुरशी लागू नये. म्हणून लोणचे बनवताना त्यात व्हिनेगर टाका आणि दोन आठवडे लोणच्याची बरणी सूर्यप्रकाशात ठेवा.
हिवाळ्यात लोणच्याला वारंवार ऊन दाखवणे गरजेचे आहे. नाहीतर थंड हवा लागून लोणचे खराब होते.
व्हिनेगरच्या वासामुळे बुरशीची वाढ होण्यास थांबते. तसेच लोणचे दीर्घकाळ चांगले राहते. चव बिघडत नाही.
लोणचे प्लास्टिकच्या भांडीत कधीच स्टोर करू नका. लवकर खराब होते. लोणचे कायम काचेच्या बरणीत किंवा सिरॅमिकच्या डब्यात ठेवा.
लोणची बनवण्यापूर्वी ताज्या भाज्या, फळे, मसाले यांचा वापर करा. तसेच सर्व सुकलेले पदार्थ वापरा.