Shreya Maskar
लिंबू जास्त काळ ताजे ठेवण्यासाठी पाण्यात भिजवून ठेवा. यामुळे ते ताजे राहतील. लिंबू छोट्या आकाराचे घ्या.
एका बरणीत पाणी भरा आणि त्यात लिंबू टाका. हे पाणी रोज बदलत राहा, यामुळे लिंबू २ आठवडे सहज टिकू शकतात.
पाण्यात लिंबू ठेवल्याने त्यांची आर्द्रता टिकून राहते आणि ते सुकत नाहीत.
लिंबू फ्रिजमध्ये ठेवायचे असल्यास दोन पद्धतींचा वापर करा. एक लिंबू पेपरमध्ये गुंडाळून ठेवा. किंवा दुसरे मऊ ओल्या कपड्यात गुंडाळून ठेवा.
ओला कपडा लिंबूमधील अतिरिक्त आर्द्रता शोषून घेतो, ज्यामुळे फळाला बुरशी लागत नाही. हवा खेळती राहते.
लिंबू झिपलॉक बॅगमध्ये ठेवून ती पिशवी फ्रिजमध्ये ठेवा. जेणेकरून जास्त काळ लिंबू फ्रेश राहतील आणि त्यांची चव बदलणार नाही.
लिंबू दीर्घकाळ टिकवण्यासाठी त्यांचा रस काढून बर्फाच्या ट्रेमध्ये फ्रिज करून ठेवा. गरजेनुसार याचा वापर करा.
कापलेले लिंबू कधीच फ्रिजमध्ये उघडे ठेवू नका. त्यावर थोडे मीठ आणि साखर लावून छोट्या डब्यात ठेवून द्या. उघडे लिंबू पटकन सुकते आणि काळे पडते.