Shreya Maskar
हिवाळ्यात पालेभाज्या गाडीवरून, दुकानातून खरेदी करा. रस्त्यावरून भाजी विकत घेणे टाळा. कारण थंड हवेमुळे भाजीचा पोत, चव बिघडते. तसेच भाजीवर धूळ लागते.
गाडीवरून, दुकानातून फ्रेश भाजी खरेदी करता येते. तसेच चांगल्या दर्जाची भाजी देखील मिळते. ही भाजी जास्त ताजी असण्याची शक्यता असते.
पालेभाज्या स्वच्छ करण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा. तुम्ही कोमट पाण्यात मीठ टाकू शकता. यामुळे भाजीतील घाण, धूळ , जंतू निघून जातात.
पालेभाज्या चांगल्या फ्रेश राहण्यासाठी त्यावर कीटकनाशक, औषधांची फवारणी केली जाते. कीटकनाशक आरोग्यासाठी घातक असतात.
कीटकनाशक आणि औषधांची फवारणी झाल्यामुळे गरम पाण्यात भाजी धुणे कधीही चांगले.
कीटकनाशकांचा प्रभाव कमी करण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करा. बेकिंग सोडा पाण्यात मिक्स करून भाजी धुवा.
हिवाळ्यात हिरवीगार कोवळी भाजी निवड करा. सुकलेल्या पानांची भाजी खरेदी करू नका.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.