Shreya Maskar
कधीही भांडी गरम किंवा कोमट पाण्यात धुवावी. कारण थंड पाण्यामुळे तेलकट डाग जात नाही.
थंड पाणी बॅक्टेरियाला मारत नाही.
भांडी घासताना साबणाचा वापर कमीत कमी करावा.
भांड्याला साबण राहिल्यामुळे आरोग्याला धोका वाढतो. तसेच भांड्यांवर डाग पडतात.
भांड्यांवरील जळलेले हट्टी डाग काढण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करा.
भांडी धुवण्यासाठी तुम्ही व्हिनेगर आणि बेकिंग सोड्याचा एकत्र वापर करू शकता.
छोट्या भांड्यात व्हिनेगर गरम करून त्यात बेकिंग सोडा टाका आणि त्याने भांडी धुवा.
यामुळे भांड्यावर कोणतेच डाग, मळ, चिकटपणा उरणार नाही.