Shreya Maskar
भाजीत मीठ जास्त झाले असेल तर त्यात एक-दोन बटाट्याचे तुकडे टाका.
काही वेळाने बटाट्याचे तुकडे भाजीतून काढा. बटाटा भाजीतले अतिरिक्त मीठ शोषून घेतो.
भाजीत एक छोटा चमचा दूध टाका, जेणेकरून खारटपणा कमी होईल.
पदार्थातील मीठ कमी करण्यासाठी तुम्ही कणीक आणि मैद्याचा वापर करू शकता.
भाजीत कणकेचे छोटे गोळे करून टाका आणि काही वेळाने ते भाजीतून काढा.
भाजी खारट झाली असेल तर त्यात पाणी टाकून इतर मसाले मिक्स करा.
भाजीला एक उकळी येऊ द्या. जेणेकरून त्याची चव बदलणार आहे.
टोमॅटो आणि दही हे आंबट पदार्थ भाजीतला खारटपणा कमी करण्यास मदत करतात.