Shreya Maskar
कुकरमध्ये जास्त पाणी टाकल्यामुळे ती फसफसून बाहेर येते.
डाळीत पाणी योग्य प्रमाणात टाकल्याने डाळ चांगली शिजते आणि बाहेर येत नाही.
पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे कुकरमधील दाब वाढतो आणि पाणी बाहेर पडू लागते.
डाळ शिजवताना डाळीच्या भांड्यात एक छोटी वाटी ठेवा. त्यामुळे डाळ खूप छान मऊ शिजते.
डाळ शिजवण्यापूर्वी 15 मिनिटे गरम पाण्यात भिजत ठेवा. जेणेकरून ती लवकर शिजते.
कुकरमधून डाळ बाहेर येऊ नये म्हणून कुकरच्या शिट्टीच्या भागावर थोडे तूप लावा.
प्रेशर कुकर आणि शिट्टी बिघडली किंवा अस्वच्छ असेल तर डाळ शिजण्यास अडचणी येऊ शकतात.
डाळ शिजवताना गरम किंवा कोमट पाण्याचा वापर करा. थंड पाणी वापरणे टाळा.