Shreya Maskar
भात बनवताना कुकरमध्ये तांदूळ शिजवताना कोणती काळजी घ्यावी, जाणून घेऊयात.
एका कप तांदळासाठी साधारणपणे दीड कप पाणी टाकावे.
कुकरमध्ये कधीही तांदळाने भरलेले भांडे ठेवू नये, जेणेकरून भात भांडयाबाहेर येणार नाही.
आपले अर्धे बोट बुडले जाईल, इतकेच पाणी भातात घाला.
भात मऊ आणि मोकळा होण्यासाठी पाण्याचे प्रमाण परफेक्ट असणे महत्त्वाचे आहे.
भात शिजवताना कुकर मध्यम आचेवर ठेवा आणि तीन शिट्ट्या करा.
भात शिजवताना कुकरमध्ये जास्त थंड पाणी टाकू नका.
मोकळा आणि मऊ भात खायला देखील चांगला लागतो.