Shreya Maskar
आपण अनेक वेळा पदार्थ बनवताना चुकून तेल जास्त घालतो. ज्यामुळे पदार्थाची चव बिघडते. चला तर मग यावर रामबाण उपाय जाणून घेऊयात.
जेवणातील अतिरिक्त तेलामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवते. ज्यामुळे हृदयाचे आजार होतात.
तेल काढण्याची सिंपल पद्धत म्हणजे भाजीला उकळी येऊ द्या. ज्यामुळे अतिरिक्त तेल भाजीवर येईल. मग ते चमच्याचा साहाय्याने तुम्ही काढू शकता.
बर्फाचा तुकडा एका मोठ्या चमच्यात टाकून तो चमचा जास्त तेल पडलेल्या पदार्थात बुडवा. बर्फाला अतिरिक्त तेल लागेल.
तुम्ही जास्त तेल असलेला पदार्थ फ्रिजमध्ये ठेवा. यामुळे अतिरिक्त तेलाचा थर वरच्या पृष्ठभागावर तयार होईल. जो तुम्हाला सहज काढता येईल.
एका बाऊलमध्ये कॉर्नफ्लोअर किंवा बेसन पाणी घालून पेस्ट करून घ्या.
कॉर्नफ्लोअर किंवा बेसनमुळे एखाद्या पदार्थाची ग्रेव्ही घट्ट होते. जे भाजीतील अतिरिक्त तेल शोषून घेते.
पदार्थातील अतिरिक्त तेल काढण्यासाठी ब्रेडचा एक तुकडा भाजीत घाला आणि नंतर काढून टाका. ब्रेडचा तुकडा सर्व तेल शोषून घेईल