Shreya Maskar
अस्सल रेशीमसाठी 'सिल्क मार्क' आणि हँडलूमसाठी 'हँडलूम मार्क' आहे का ते पाहा. साडीच्या description मध्ये धाग्याचा प्रकार पाहा.
साडीचा पोत समजून घेण्यासाठी उच्च-रिझोल्यूशन, जवळून काढलेले फोटो पाहा. जर तुम्हाला शुद्ध कापड हवे असेल तर कृत्रिम मिश्रणे (synthetic blends) टाळण्यासाठी उत्पादनाचे वर्णन वाचा.
स्क्रीनच्या ब्राइटनेसनुसार रंगांमध्ये फरक असू शकतो. नैसर्गिक प्रकाशात काढलेली छायाचित्रे पाहा किंवा उत्पादनाचा खरा रंग पाहण्यासाठी त्याचा व्हिडिओ मागवा.
साडी खरेदी करण्याआधी प्रोडक्टमध्ये दिलेले ग्राहकांचे अभिप्राय नक्की वाचा. नामांकित ब्रँड्स किंवा प्रसिद्ध डिझायनर बुटीकला प्राधान्य द्या.
साडीची जर रिटर्न पॉलिसी असेल तरच खरेदी करा. जेणेकरून प्रोडक्टमध्ये काही चुका असतील तर ते तुम्ही सहजरित्य बदलू शकता. तसेच रिफंड पॉलिसी आहे का, ते ही तपासा.
साडीची एकूण लांबी तपासा. साडीसोबत शिवलेला ब्लाउज देत आहे की नाही ते पाहा. किंवा साडीतच ब्लाउजचा कपडा आहे का, चेक करा.
रेडीमेड नऊवारी साड्यांची निवड करताना, 'काष्टा'व्यवस्थित आणि आरामात बसेल याची खात्री करण्यासाठी, कंबर व नितंबांच्या अचूक मापांचा आधार घ्यावा. तसेच जर साडीसोबत रेडीमेड ब्लाउज मिळत असेल तर त्याचे मापही तपासा.
तुम्हाला जर ऑनलाइन सर्वोत्तम सौदा मिळत आहे याची खात्री असेल तर त्वरित साडी खरेदी करा. इतर अनेक वेबसाइट्सवरील किमतींची तुलना करा. तसेच सेल आणि सणासुदीच्या ऑफरवर लक्ष ठेवा.