Shreya Maskar
चपात्या कडक होत असतील तर चपातीचे पीठ मळताना त्यात पाण्याऐवजी दुधाचा वापर करा.
पीठ मळून झाल्यावर नेहमी कपड्यात १०-१५ मिनिटे झाकून ठेवा. यामुळे पीठ चांगले मुरते.
तुम्ही दुधाऐवजी फाटलेल्या दुधाचे पाणी देखील वापरू शकता. यामुळे पीठ चांगले मळले जाते आणि चपाती दीर्घकाळ मऊ राहते.
दुधामुळे चपात्या अगदी मऊ आणि टम्म फुगतात. तसेच त्या कडक होत नाहीत.
कणिक मळल्यानंतर चपातीच्या पीठाला तेल लावून ठेवा. पीठाला कोमट तेल लावा. तसेच चपातीसाठी चांगल्या दर्जाचे तेल वापरा.
तुम्ही चपाती करताना तेलाऐवजी तुपाचा देखील वापर करू शकता. गावाकडचे शुद्ध तुपाचा वापर करा.
तसेच चपात्या बनल्यावर त्या मऊ कपड्यामध्ये बांधून ठेवा. त्या जास्त काळ मऊ राहतील.
मऊ-लुसलुशीत चपाती हवी असेल तर कणिक आधीपासून मळून ठेवू नका. जेव्हा चपात्या बनवायच्या असतील तेव्हाच पीठ मळा.