Shreya Maskar
दूध उतू जाऊ नये म्हणून भांड्याच्या कडेला लाकडी चमचा किंवा उलथाणे ठेवा.
लाकडी चमच्यामुळे दुधाला उकळी आल्यावर ती भांड्याच्या बाहेर न येता चमच्याला चिकटून राहते.
दूध गरम करण्यासाठी मोठे भांडे वापरा किंवा भांड्याचे काठ भरून दूध उकळायला ठेवू नका. यामुळे दूध उतू जाते.
दूध नेहमी मंद आचेवर गरम करा. ज्यामुळे दूध उतू जाणार नाही.
दूध गरम करताना न विसरता त्यात थंड पाणी टाका.
थंड पाण्यामुळे दूध ओतू जाणार नाही आणि चांगले गरम होईल.
दूध गरम करताना त्यात एक थेंब नारळाचे तेल घाला. दूध कधीच उतू जात नाही.
दूध गरम करताना दुधाचे भांडे अर्धवट झाकून ठेवा.