Shreya Maskar
भेंडी कापताना हाताला चिकट लागतात. तसेच भाजी देखील चिकट होते. त्यामुळे चिकटपणा दूर करण्यासाठी आताच उपाय जाणून घेऊयात.
बाजारातून भेंडी निवडता विशेष काळजी घ्या. कच्ची भेंडी निवडा.
कच्ची भेंडी ओळखण्यासाठी भेंडीचे देठ तोडून पाहा.
पाण्यामुळे भेंडीमधील चिकटपणा वाढतो, त्यामुळे भेंडी धुतल्यानंतर कापडाने कोरडी करा.
भेंडी शिजवताना त्यात एक चमचा दही घाला जेणेकरून चिकटपणा कमी होईल.
गुळगुळीत भेंडी कोरडी करण्याचा रामबाण उपाय म्हणजे बेसन पीठ भाजीत मिक्स करा.
भेंडी कापण्यापूर्वी व्हिनेगर टाकलेल्या पाण्यात भिजवून घ्या.
भेंडी चिरताना त्याचे मोठे तुकडे करा म्हणजे भाजी चिकट होण्याची शक्यता कमी होते.