Shreya Maskar
आज अमृता रावचा (7 जून) वाढदिवस आहे.
बॉलिवूड अभिनेत्री अमृता राव आज 44 वर्षांची झाली आहे.
अमृताने आजवर खूप कमी पण सुपरहिट चित्रपट केले आहेत.
2003 मध्ये 'इश्क विश्क' या चित्रपटात अमृता राव बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरसोबत झळकली होती.
2004 साली रिलीज झालेला 'मैं हूं ना' चित्रपटात अमृता राव एका हटके अंदाजात पाहायला मिळाली.
2005 ला कॉमेडी चित्रपट 'वाह! लाइफ हो तो ऐसी'मध्ये अमृता राव मुख्य भूमिकेत झळकली.
2006 मधील 'विवाह' हा अमृता रावचा गाजलेला चित्रपट आहे.
2008 मध्ये अमृता राव श्रेयस तळपदेसोबत 'वेलकम टू सज्जनपुर' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली.