धूळ आणि घामाने चेहरा काळाकुट्ट झालाय? 'या' ५ घरगुती उपायांनी १० मिनिटांत मिळवा नॅचरल ग्लो

Manasvi Choudhary

चेहऱ्याची काळजी कशी घ्यायची?

अनेकदा कामावरून, बाहेरून प्रवास करून आल्यानंतर चेहरा डल दिसतो. काळा पडलेला असते. बाहेरील धूळ आणि घामामुळे चेहऱ्यावर परिणाम होतो.

How to Remove Face Tan

घरगुती सोपे उपाय

चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स, पिंपल्स आणि डलनेस वाढतो यावर उपाय म्हणून अनेक महिला व मुली पार्लरमध्ये जाऊन महागडे फेशिअल करतात परंतू आज आम्ही तुम्हाला घरगुती सोपे उपाय सांगणार आहोत.

How to Remove Face Tan

कच्चं दूध आणि लिंबाचा रस

कच्चं दूध हे त्वचेसाठी नॅचरल क्लिंन्झर म्हणून काम करते. कच्च्या दुधात लिंबू मिक्स करा आणि चेहऱ्यावर लावा ५ मिनिटांनी चेहरा धुवा. यामुळे चेहऱ्यावरील सगळी धूळ आणि टॅनिंग निघून जाईल.

Raw Milk & Lemon Juice

कोरफड जेल आणि गुलाब पाणी

घाम आणि उन्हामुळे त्वचा डिहायड्रेट होते. यावर उपाय म्हणून तुम्ही कोरफड जेलमध्ये थोडे गुलाब पाणी मिक्स करून चेहऱ्याला मसाज करा.

Aloe Vera & Rose Water

बेसन आणि दह्याचा फेस पॅक

बेसनाचा उपाया चेहऱ्यासाठी फायदेशीर मानला जातो. फार पूर्वीपासून लोक चेहऱ्यावर बेसन लावतात. बेसन पिठात दही आणि हळद मिक्स करून ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि १० मिनिटांनी धुवा.

Besan & Curd Face Pack

टोमॅटो आणि साखरेचा स्क्रब

टोमॅटोमध्ये लायकोपीन असते, जे नैसर्गिक ब्लिचिंगचे काम करते. एक टोमॅटो अर्धा कापून त्यावर थोडी पिठीसाखर टाका आणि चेहऱ्यावर हलक्या हाताने स्क्रब करा.

Tomato & Sugar Scrub | Yandex

काकडीचा रस

किसलेल्या काकडीचा रस चेहऱ्यावर लावा. घामामुळे होणारी जळजळ कमी होते आणि त्वचा इन्स्टंट ग्लो करते.

Cucumber Juice for Cooling | Social Media

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: गुलाबी रंगाच्या 'या' फळामुळे कोरियन मुलींसारखी दिसेल तुमची त्वचा

येथे क्लिक करा...