Shreya Maskar
रायगड जिल्ह्यात वसलेले खोपोली हे सुट्टीच्या दिवसांत पर्यटनासाठी एक उत्तम लोकेशन आहे. साहसी क्रीडा, शांत निसर्गाचा येथे आनंद घेता येतो. वीकेंड गेटवेसाठी बेस्ट लोकेशन आहे.
झेनिथ धबधबा पावसाळ्यातील एक लोकप्रिय ठिकाण. मात्र येथे कायम थंड वातावरण अनुभवता येते. धबधब्यावरून कोसळणाऱ्या पांढऱ्या शुभ्र पाण्यामुळे खाली एक नैसर्गिक तलाव तयार होतो.
टेकडीवरील एक शांत तलाव, जिथून सह्याद्री पर्वतरांगांचे सुंदर दृश्य दिसते. कुटुंबासोबत दुपारच्या जेवणासाठी, फोटोग्राफीसाठी वीकेंड ट्रिपसाठी येथे नक्की या. सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
कुणे धबधबा महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक आहे. येथून एक नयनरम्य, हिरवीगार पार्श्वभूमी दिसते. संध्याकाळच्या सूर्यास्ताच्या दृश्यांसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
पाली जवळ स्थित असलेल्या सरसगड किल्ल्यावरून खोपोलीचा विहंगम देखावा दिसतो. याच्या माथ्यावर पोहोचण्यासाठी एका उत्साहवर्धक आणि निसर्गरम्य ट्रेक करावा लागतो.
जांबरुंग जवळ स्थित असलेला केपी १०० फूट उंच धबधबा, गर्दीपासून दूर एका निवांत ठिकाणी लपलेला आहे. धबधब्याच्या पायथ्याशी एक स्वच्छ व नैसर्गिक जलकुंड आहे.
खोपोलीला गेल्यावर तुम्हाला अनेक ॲडव्हेंचर - थीम पार्क पाहायला मिळतील. जेथे तुम्ही वन डे ट्रिप प्लान करू शकता. रोलर कोस्टर, वेव्ह पूल यांसारख्या अॅक्टिव्हिटीजचा आनंद घेता येतो.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.