Goregaon Tourism : गजबजलेल्या मुंबईत शांततेचा निवांत कोपरा, 'गोरेगाव'मध्ये लपलंय काश्मीरहून सुंदर ठिकाण

Shreya Maskar

मुंबई- गोरेगाव

'छोटा काश्मीर' हे पर्यटन स्थळ मुंबईमधील गोरेगाव (पूर्व) येथील आरे कॉलनीमध्ये आहे. येथे तुम्ही उन्हाळ्यात वीकेंडला मजा-मस्ती करू शकता. येथे गेल्यावर तुम्हाला बोटिंगचा आनंद घेता येतो.

Mumbai – Goregaon | google

बोटिंग

कॉलनीच्या घनदाट जंगलात एक सुंदर तलाव आहे. जेथे तुम्ही बोटिंग करू शकता. येथे सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.

Boating | google

कसं जाल?

बोरीवली ट्रेन पकडून तुम्ही गोरेगाव स्टेशनला उतरा. त्यानंतर पुढे पूर्वेला जाऊन 'छोटा काश्मीर' साठी रिक्षा पकडा. अवघ्या १० मिनिटांत उद्यानात पोहचाल.

How to Get There? | google

फोटोशूट

'छोटा काश्मीर' हे फोटोशूटसाठी एक भन्नाट लोकेशन आहे. येथे उद्यानात रंगीबेरंगी फुल आणि हिरवळ पाहायला मिळते. येथे तुम्ही प्री-वेडिंग शूट, बर्थडे शूट करू शकता.

Photoshoots | google

मिनी काश्मीर

मुंबईतील छोटा काश्मीरला 'मिनी काश्मीर' म्हणूनही ओळखले जाते. येथे भरपूर झाडी असल्यामुळे येथे कायम थंड वातावरण अनुभवता येते. छोटा काश्मीर फॅमिली आणि जोडप्यांसाठी बेस्ट लोकेशन आहे.

Mini Kashmir | google

बॉलिवूड शूटिंग

'छोटा काश्मीर' हे पूर्वीचे बॉलिवूड शूटिंगचे सुंदर लोकेशन होते. येथे वीकेंडला तुम्हाला गर्दी पाहायला मिळते.

Bollywood Filming | google

मुंबईमधील प्रसिद्ध उद्याने

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, दादर-शिवाजी पार्क, हँगिंग गार्डन्स, राणीची बाग, कमला नेहरू पार्क ही मुंबईमधील प्रसिद्ध उद्याने आहेत.

Famous Parks in Mumbai | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

disclaimer | google

NEXT : मुंबईच्या इतिहासाचा साक्षीदार, वांद्रेपासून हाकेच्या अंतरावर वसलाय 'हा' किल्ला

Fort In Mumbai | saam tv
येथे क्लिक करा..