Shreya Maskar
मुंबईतील माहीम खाडीजवळ वसलेला 'माहीम किल्ला' हा एक ऐतिहासिक सागरी किल्ला असून तो मुंबई बेटांवरील सर्वात जुना किल्ला मानला जातो.
राजा प्रतापबिंबा किंवा त्याच्या वंशजांनी माहीमचा किल्ल्याची उभारणी केली होती. हा किल्ला 'जलमार्गाचा द्वाररक्षक' म्हणून ओळखला जात असे.
मुंबईतील किल्ले हे प्रामुख्याने १७ व्या आणि १८ व्या शतकातील ऐतिहासिक वास्तू आहेत, ज्यांनी शहराच्या संरक्षणात आणि इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
माहीमच्या किल्ल्यावरून 'वांद्रे-वरळी सी लिंक'चे विहंगम दृश्य दिसते. हा किल्ला वांद्रेपासून जवळ आहे. सध्या हा किल्ला थोडा जीर्ण अवस्थेत आहे.
माहीम किल्ल्याचा मुख्य उद्देश मुंबईच्या बेटांचे संरक्षण करणे आणि माहीमच्या खाडीतून होणाऱ्या सागरी व्यापारावर लक्ष ठेवणे हा होता.
माहीमचा किल्ला हा मुंबईतील माहीम भागात, मिठी नदीच्या मुखाशी आणि माहीमच्या खाडीजवळ स्थित आहे.
माहीम किल्ल्याच्या परिसरातील प्रमुख आकर्षणामध्ये 'वांद्रे-वरळी सी लिंक'चे विहंगम दृश्य, माहीम समुद्रकिनारा (चौपाटी) आणि सेंट मायकल चर्च , शीतलादेवी मंदिर यांसारख्यी पर्यटन स्थळे आहेत.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.