Manasvi Choudhary
उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना नवनवीन गोष्टी शिकवणे. मुलांच्या विकासासाठी फायदेशीर आहे.
वेळप्रसंगी स्वत:चे संरक्षण कसे करता यावे, याच्या ट्रिक्स मुलांना शिकवा. त्याचा क्लास देखील तुम्ही लावू शकता.
व्यायाम हा निरोगी शरीरासाठी अत्यंत महत्वाचा आहे. सुट्टीच्या दिवशी सकाळी लवकर उठून व्यायाम करण्याची सवय लावा.
मुलांना नेहमी खरं बोलण्याची सवय लावा. चूक झाली तर ती मान्य करण्याची सवय लावा. अनेकदा मुले कोणतीही घडलेली घटना सांगण्यासाठी घाबरतात आणि खोटे काहीही सांगतात.
चुकीच्या गोष्टींमध्ये नाही किंवा विरोध करण्याची हिंमत मुलांमध्ये असणे महत्वाचे आहे. यासाठी मुलांना स्वत:चे मत मांडायला, बोलायला शिकवा.
घरातील वडीलधाऱ्या मंडळीचा आदर करायला शिकवा. इतरांच्या भावना समजून घ्यायला शिका.