Shreya Maskar
तुम्ही फक्त २००-३०० रुपयात पालघर ट्रिप प्लान करू शकता. यासाठी रेल्वे आणि बसने प्रवास करा. तसेच या पर्यटन स्थळांच्या आजूबाजूला चांगले फूड मिळते.
पालघरमधील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणजे केळवा बीच. येथे तुम्ही साहसी क्रीडांचा आनंद घेऊ शकता. प्री-वेडिंग फोटोशूटसाठी हे सुंदर लोकेशन आहे.
पालघर जिल्ह्यातील शिरगाव येथे समुद्रकिनाऱ्याजवळ वसलेला शिरगाव किल्ला हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे. जो मराठा साम्राज्याच्या काळात सागरी संरक्षणासाठी वापरला जात होता.
पालघर जिल्ह्यामध्ये दांडी बीच आहे. हे एक हिडन लोकेशन आहे. हा समुद्रकिनारा बोईसर जवळ असून एक शांत आणि कमी गर्दीचे निसर्गरम्य ठिकाण आहे.
शिरपामाळ हे पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील एक अत्यंत महत्त्वाचे ऐतिहासिक ठिकाण आहे, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेच्या मोहिमेवर असताना रात्रीचा मुक्काम केला होता.
कळंब बीच हा पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथील एक शांत, सुंदर आणि कमी गर्दीचा समुद्रकिनारा आहे. कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी, फोटोशूट्ससाठी बेस्ट ठिकाण आहे.
आलेवाडी बीच हा पालघर जिल्ह्यातील एक लपलेला आणि शांत समुद्रकिनारा आहे. येथे घोडेस्वारीचा आनंद घेता येतो. तसेच मुलं येथे खेळताना दिसतात.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.