India Tourism : लाल दगड अन् संगमरवरी कला, 'हा' वास्तुकलेचा अद्भुत नजारा पाहून तुमचे डोळे दिपतील

Shreya Maskar

दिल्लीतील ऐतिहासिक ठिकाण

कुतुब मिनार हे दक्षिण दिल्लीतील मेहरौली येथे वसलेले आहे. हे जगातील महत्त्वाचे एक ऐतिहासिक ठिकाण आहे.

A Historical Landmark in Delhi | google

कुतुब मिनार

कुतुब मिनारजवळ अलाई मिनार, कुव्वत-उल-इस्लाम मशीद, मेहरौली पुरातत्व उद्यान, दिल्ली हाट आणि लोहस्तंभ ही इतर पर्यटन स्थळे आहेत.

The Qutub Minar | google

कुतुब मिनारची उंची

कुतुब मिनार ७२ मीटर उंचीचा जगातील सर्वात उंच विटांचा मिनार म्हणून प्रसिद्ध आहे. १२ व्या शतकात उभारलेली ही वास्तू इंडो-इस्लामिक स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना मानली जाते.

Height of the Qutub Minar | google

वैशिष्ट्ये

दिल्लीमध्ये स्थित असलेले आणि 'युनेस्को जागतिक वारसा स्थळ' म्हणून मान्यता पावलेले हे ठिकाण येथील नाजूक कोरीव काम, लाल वालुकाश्म संगमरवर वापरून करण्यात आलेली याची बांधणी यांसाठी ओळखले जाते.

Key Features | google

बांधकाम

कुतुब मिनारचे बांधकाम मामलूक घराण्याचा सुलतान कुतुबुद्दीन ऐबक याने ११९९मध्ये आपल्या विजयश्रीचे प्रतीक म्हणून सुरू केले. पुढे त्याचा उत्तराधिकारी सुलतान अल्तमश याने १२३०मध्ये ह्या मनोऱ्याचे बांधकाम पूर्ण केले.

Construction | google

कसं जावे?

कुतुब मिनारला जाण्यासाठी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन जंक्शन जवळ आहे. कुतुबमिनारला भेट देण्यासाठी दिल्ली मेट्रोच्या यलो लाईनवरील 'कुतुब मिनार मेट्रो स्टेशन' हे सर्वात जवळचे स्टेशन आहे.

How to Get There? | google

फोटोशूट

कुतुब मिनार येथून निसर्गाचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. तसेच आजूबाजूला फोटोशूटचे सुंदर ठिकाणे आहेत.

Photoshoot | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Qutub Minar | Google

NEXT : हिरवागार निसर्ग, निळाशार समुद्र अन् उंच डोंगर; वीकेंडला फिरायला 'विरार'च बेस्ट, पाहा टॉप ५ डेस्टिनेशन्स

Virar Picnic Spot | saam tv
येथे क्लिक करा...