Shreya Maskar
पेनकिलरमधील घटक पोटाच्या आतील आवरणाला नुकसान पोहोचवू शकतात, ज्यामुळे छातीत जळजळ, रक्तस्त्राव किंवा अल्सर होऊ शकतात.
पेनकिलरचा ओव्हरडोस घेतल्यास यकृतावर ताण येऊ शकतो, ज्यामुळे तीव्र सूज किंवा तीव्र यकृत निकामी होण्याची शक्यता असते.
रोजच्या छोट्या- मोठ्या दुखण्यासाठी पेनकिलर खाल्याने मूत्रपिंडांना होणारा रक्तपुरवठा मर्यादित होतो, ज्यामुळे क्रॉनिक किडनी डिसीज किंवा अचानक किडनीला इजा होण्याची शक्यता असते.
काही वेदनाशामक औषधे हृदयविकाराचा झटका, पक्षाघात आणि उच्च रक्तदाबाचा धोका वाढवू शकतात. त्यामुळे त्याचे सेवन टाळा.
रोजची पेनकिलर खाल्ल्यामुळे त्वचेवर सौम्य पुरळ येते. तसेच आणखी त्वचेचे गंभीर आजार होऊ शकतात. उदा. स्टीव्हन्स-जॉनसन सिंड्रोम (हा आजार औषधांच्या दुष्परिणामांमुळे किंवा संसर्गामुळे उद्भवतो, ज्यामध्ये त्वचेवरील साल निघतात आणि फोड येतात.)
पेनकिलरमुळे पचनसंस्थेची क्रिया मंदावतात, ज्यामुळे अनेकदा तीव्र आणि दीर्घकाळ टिकणारी बद्धकोष्ठता होते.
पेनकिलरमधील घटक मज्जासंस्थेवर परिणाम करून तीव्र थकवा, गुंगी आणि विचार करण्याची क्षमता कमी होण्यास कारणीभूत ठरू शकतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.