Shreya Maskar
'ढक बहिरी' हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील कर्जत आणि लोणावळ्याजवळील सह्याद्री पर्वतरांगांमधील थरारक ट्रेकिंग स्पॉट आहे.
२,७०० फूट उंचीवर असलेल्या या ठिकाणाचे मुख्य आकर्षण म्हणजे 'बहिरी' गुहा होय. येथे ७० अंशांच्या कोनात असलेला जवळजवळ उभा खडक (रॉक पॅच) पार करावा लागतो.
'ढक बहिरी' ही सह्याद्री पर्वतरांगेतील, कर्जतपासून सुमारे १५ किमी अंतरावर असलेली एक भव्य गुहा आणि किल्ला आहे. येथे भैरवनाथाचे मंदिर देखील आहे. येथे अत्यंत कठीण असा खडकाळ चढण-मार्ग आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थानिक देवतेचे दर्शन घेण्यासाठी 'ढक बहिरी' गुहांना भेट दिली होती. तसेच, या परिसराच्या संरक्षणासाठी आणि सामरिक देखरेखीसाठी 'ढक किल्ला' बांधण्यात ऐतिहासिक सहभाग होता.
सुमारे २,७०० फूट उंचीवर वसलेल्या या गुहांमधून आजूबाजूच्या दऱ्या, घनदाट जंगले आणि राजमाची व ड्यूक्स नोज (Duke's Nose) यांसारख्या सह्याद्रीतील इतर प्रसिद्ध ठिकाणांची विहंगम आणि मनमोहक दृश्ये दिसतात.
मुंबईहून 'ढक बहिरी' किल्ला आणि गुहेपर्यंत पोहोचण्यासाठी, आधी लोकल ट्रेनने कर्जतला जावे. तिथून एसटी बस किंवा शेअरिंग रिक्षाने 'संदशी' किंवा 'जांभिवली' या पायथ्याच्या गावापर्यंत जा.
पावसाळ्यात तुम्ही आवर्जून 'ढक बहिरी' ला भेट द्या. तुम्ही येथे मित्रांसोबत वन डे ट्रिप प्लान करा.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.