Thane Fort : भव्य प्रवेशद्वार, बुरूज अन्...; ठाण्यात लपलाय ऐतिहासिक किल्ला, मित्रांसोबत वीकेंडला करा भटकंती

Shreya Maskar

ठाणे

पिंपळास किल्ल्याला 'पिंपळास कोट' असेही म्हणतात. हा पोर्तुगीजांनी बांधलेला १७ व्या शतकातील एक प्राचीन आणि सहज पोहोचता येण्याजोगा टेहळणी बुरूज (वॉच-टावर) आहे.

Thane | google

पिंपळास किल्ला

पिंपळास किल्ला भिवंडी येथे ठाणे जिल्ह्यात असून याची उंची १०० फूट उंच आहे. हिरव्यागार झाडांनी किल्ला वेढलेला आहे. हा किल्ला मूळतः उल्हास नदीच्या जलमार्गावरून होणाऱ्या मराठा नौदलाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आला होता.

Pimplas Fort | google

किल्ल्याची रचना

पिंपळास किल्ला पोर्तुगीजांसाठी एक धोरणात्मक टेहळणी चौकी म्हणून काम करत होता. पिंपळास किल्ल्याची रचना एका लहान लष्करी चौकीच्या स्वरूपात करण्यात आली होती.

Fort structure | google

कसं जाल?

पिंपळास किल्ल्यावर जाण्यासाठी ठाणे आणि कल्याण हे जवळचे स्टेशन आहे. स्टेशनला उतरून तुम्ही बस, रिक्षा किंवा टॅक्सीने किल्ल्याच्या पायथ्याच्या गावी पोहचाल.

how do you go | google

ऐतिहासिक ठिकाण

कल्याण बंदराच्या दिशेने होणारा मराठा नौदलाचा विस्तार रोखण्यासाठी मूळतः बांधलेला हा किल्ला, मुंबईजवळील एक शांत आणि ऐतिहासिक वारसा जपणारे ठिकाण आहे.

Historical place | google

आजूबाजूचा परिसर

पिंपळास किल्ल्याच्या पश्चिमेकडे कमानीचे प्रवेशद्वार, पेशवेकालीन शिवमंदिर आणि प्राचीन वाडे पाहायला मिळतात. पिंपळास किल्ल्याच्या शेजारी खारबाव आणि कांबे यांसारखे किल्ले होते.

Surroundings | google

निसर्ग सौंदर्य

पिंपळास किल्ल्यावरून खाडी आणि आजूबाजूच्या हिरवळीची विहंगम दृश्ये दिसतात. तुम्ही येथे वीकेंडला फिरण्याचा प्लान करू शकता.

Beauty of nature | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

fort | google

NEXT : महाराष्ट्रातील 'हे' ५ धबधबे खूप कमी लोकांना माहितेय, एकदा पाहिल्यावर प्रेमातच पडाल

Maharashtra Waterfalls | saam tv
येथे क्लिक करा...