Maharashtra Waterfalls : महाराष्ट्रातील 'हे' ५ धबधबे खूप कमी लोकांना माहितेय, एकदा पाहिल्यावर प्रेमातच पडाल

Shreya Maskar

देवकुंड धबधबा

देवकुंड धबधबा रायगड येथे भिराजवळील घनदाट जंगलात लपलेला आहे. स्वच्छ आणि पाचूच्या रंगासारखा निळसर धबधबा पाहायला पर्यटक पावसाळ्यात गर्दी करतात.

Devkund Falls | google

काळू धबधबा

काळू धबधबा माळशेज घाट येथे आहे. काळू धबधबा काळू नदीतून सुमारे ४०० ते १,२०० फूट खोल दरीत ५ टप्प्यांत कोसळतो. येथे ट्रेकिंगचा भन्नाट अनुभव मिळतो.

Kalu Waterfall | google

नाणेमाची धबधबा

रायगड येथे नाणेमाची धबधबा आहे. सह्याद्रीच्या रांगांमधील घनदाट जंगलात धबधबा वसलेला आहे. धबधब्याच्या पाण्याचा खाली हिरवागार तलाव पाहायला मिळतो.

Nanemachi waterfall | google

नाणेघाट रिव्हर्स (उलटा) धबधबा

सह्याद्री पर्वतरांगांमध्ये उलटा धबधबा वसलेला आहे. येथे दरीतून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे पाण्याचा प्रवाह खाली न पडता उलट्या दिशेने (वरच्या बाजूला) उडताना दिसतो. पावसाळ्यात येथे आवर्जून जा.

Naneghat Reverse Waterfall | google

कुंभे धबधबा

रायगड येथे कुंभे धबधबा आहे. निसर्गाच्या सानिध्यात आणि हिरवाईने किल्ला वेढलेला आहे. उंचावरून कोसळणारा हा पांढरा शुभ्र धबधबा पावसाळ्यात जणू स्वर्गच भासतो.

Kumbh falls | google

वजराई धबधबा

साताऱ्यात वजराई धबधबा आहे. जो भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक आहे. पावसाळ्यात धबधब्याच्या पाण्याखाली चिंब भिजण्याचा अनुभवच खूप वेगळा आहे.

Vajrai Falls | google

दाभोसा धबधबा

ठाणे जिल्ह्यात जव्हार येथे दाभोसा धबधबा आहे. प्रचंड प्रवाहाने हा धबधबा खळखळतो. जिथे रॅपलिंग आणि झिप-लाइनिंगसारख्या साहसी खेळांचा आनंद घेता येतो.

Dabhosa Falls | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : पेशव्यांच्या वाड्याला ‘शनिवार वाडा’ हे नाव कसे मिळाले? कारण जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

Shaniwar Wada | saam tv
येथे क्लिक करा...