Sakshi Sunil Jadhav
तुमच्याही घरात रात्रीच्या वेळेस छोटी झुरळं फिरत असतील तुम्ही पुढचा सोपा उपाय करून पाहाच.
झुरळांचा आकार लहान असल्याने ते कोणत्याही कानाकोपऱ्यात लपतात आणि त्यांची पिल्लं जन्माला घालतात.
झुरळं तुमच्या कपड्यांमध्ये, किचनमधल्या सगळ्या भांड्यांवर फिरतात. त्याने तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातल्या व्यक्ती आजारी सुद्धा पडू शकतात.
झुरळांना लांब ठेवण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा आणि साखरेचे मिश्रण समान प्रमाणात घेऊन त्याची पूड बनवा.
पुढे ही पूड तुम्ही झुरळं येतात तिथे टाकून ठेवा. झुरळांनी ही पूड खाल्ली की ती मरून जातात.
तुम्ही याऐवजी तेजपत्त्याची पूड करून ती स्वयंपाकघरातील कपाटांमध्ये, गॅसच्या शेगडीजवळ, सिंकखाली आणि फटींमध्ये टाका. यानेही झुरळं गायब होतील.
आणखी एक सोपा उपाय म्हणजे, तुम्ही व्हिनेगर स्प्रे बॉटलमध्ये पाणी , लिंबाचा रस आणि पांढरा व्हिनेगर मिक्स करा. हा स्प्रे झुरळं घालवतो.
झुरळं घालवण्यासाठी घरात स्वच्छता आणि कोरडेपणा ठेवणं गरजेचं आहे. खरकडी भांडी अजिबात ठेवू नका. त्याने झुरळं कमी होतात.