Shreya Maskar
मुंबई-पुण्याजवळ पावसाळ्यात स्वस्तात मस्त मजा करता येईल अशी सुंदर ठिकाणे आहेत.
डोंगर, हिरवळ, तलाव आणि टायगर्स लीप पाहायचे असेल तर लोणावळा आणि खंडाळ्याला भेट द्या.
टॉय ट्रेनमध्ये बसून जंगल सफारी करायची असेल तर माथेरान बेस्ट ठिकाण आहे.
ट्रेकिंग आणि कपल स्पॉट म्हणून इगतपुरी प्रसिद्ध आहे.
कर्नाळा अभयारण्य आणि किल्ला दोन्ही पर्यटकांचे मोठे आकर्षण आहेत.
कर्नाळा पक्षी अभयारण्य हे पक्षी निरीक्षणासाठी प्रसिद्ध आहे.
कर्नाळा किल्ला ट्रेकिंग आणि गिर्यारोहकांसाठी ओळखला जातो.
रिव्हर राफ्टिंगचा आनंद घ्यायचा असेल तर कोलाडला भेट द्या.