Diva Junction : 'दिवा जंक्शन'जवळील ५ मनमोहक पर्यटन स्थळे, पावसाळ्यात फॅमिली ट्रिप प्लान कराच

Shreya Maskar

पारसिक हिल धबधबा

पारसिक हिल धबधबा पावसाळ्यात वन डे ट्रिपसाठी बेस्ट आहे. तुम्हाला येथे उंचावरून कोसळणारा पांढरा शुभ्र धबधबा पाहायला मिळेल. तुम्ही येथे भन्नाट फोटोशूट देखील करू शकता.

Parsik Hill Waterfall | google

ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य

नवी मुंबईतील ऐरोली येथे असलेले ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य पाहायला परदेशी पर्यटकही येतात. येथे खारफुटीची वने (मँग्रोव्हज) आणि चिखलाचे पट्टे पाहायला मिळतात. ऑक्टोबर ते मे महिन्यात हे ठिकाणे गुलाबी रंगाच्या 'गुलाबी समुद्रा'सारखे दिसते.

Thane Bay Flamingo Sanctuary | google

येऊर हिल्स

येऊर हिल्स हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अंतर्गत वसलेले एक हिरवेगार पर्यटन स्थळ आहे. तुम्ही येथे फॅमिलीसोबत ट्रिप प्लान करू शकता. सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.

Yeur Hills | google

गायमुख पॉइंट

ठाणे येथील गायमुख पॉइंट, गायमुख चौपाटी किंवा बीच म्हणूनही ओळखला जातो. हा ठाणे-वसई खाडीच्या काठावरील निसर्गरम्य दृश्ये, शांत वातावरण आणि सूर्यास्ताच्या नयनरम्य दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे.

Gaymukh Point | google

उपवन तलाव

ठाणे उपवन तलाव पाहायला पावसाळ्यात नक्की जा. येथे तुम्हाला बोटिंगचा आनंद घेता येतो. हे ठिकाण येथील स्थानिक लोकांसाठी विरंगुळ्याचे बेस्ट ऑप्शन आहे.

Upvan Lake | google

रेतीबंदर चौपाटी

रेतीबंदर चौपाटीला 'पारसिक रेतीबंदर' म्हटले जाते. येथे तुम्ही जोडीदारासोबत निवांत संध्याकाळ घालवू शकता. निसर्गाचा सुंदर नजारा येथे पाहायला मिळतो.

Chowpatty | google

कोलशेत खाडी

ठाणे येथे असलेली कोलशेत खाडी ही निसर्गाच्या सानिध्यातील एक शांत ठिकाण आहे. येथे पक्षी निरीक्षणाचा आनंद घेता येतो. हे शांत, खारफुटीच्या झाडांनी वेढलेले जलाशय असून ते ठाणे फ्लेमिंगो अभयारण्याशी जोडलेले आहे.

Kolshet | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : जगातील सर्वात धोकादायक किल्ला! वाचा 'कलावंतीण दुर्ग' नावाचा रहस्यमय इतिहास

Kalavantin Durg | saam tv
येथे क्लिक करा...