Shreya Maskar
मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना 'दादासाहेब फाळके पुरस्कार 2023' या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
मोहनलाल यांच्यावर मनोरंजनसृष्टीतून आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मोहनलाल यांच्या अनेक मल्याळम चित्रपटांचे हिंदी सिनेमांमध्ये रिमेक करण्यात आले आहे.
अजय देवगणचा दृश्यम चित्रपट मोहनलाल यांचा मल्याळम चित्रपट 'दृश्यम'चा रिमेक आहे. क्राइम थ्रिलर चित्रपट आहे.
अक्षय कुमारचा 'खट्टा मीठा' चित्रपट मोहनलाल यांच्या वेल्लनकालुदे नाडूचा रिमेक आहे.
अक्षय कुमारचा 'भूल भुलैया' हा मणिचित्रथझूचा या मल्याळम चित्रपटांचे रिमेक आहे.
मोहनलाल यांचा 'बोईंग बोईंग' चित्रपट हॉलिवूड सिनेमाचा रिमेक आहे. त्यानंतर 'गरम मसाला' नावाने हिंदीमध्ये रिमेक करण्यात आला. ज्यात जॉन अब्राहम आणि अक्षय कुमार झळकले.
'मुस्कुराहाट' चित्रपट 'किलुक्कम' चित्रपटाचा रिमेक आहे.