Manasvi Choudhary
तुमचा एटीएम पिन हा अत्यंत गोपनीय असतो. तो कधीही कोणाशीही शेअर करू नका. पिन टाकताना नेहमी दुसऱ्या हाताने कीपॅड झाकून ठेवा. फोन कॉल, मेसेज किंवा ईमेलद्वारे कोणी पिन विचारल्यास तो कधीही देऊ नका.
पैसे काढताना अडचण आल्यास कधीही कोणत्याही अनोळखी व्यक्तीची मदत घेऊ नका किंवा त्यांना तुमचे एटीएम कार्ड हातात देऊ नका. अनेकदा लबाक लोक हातचलाखीने कार्ड बदलतात.
व्यवहार पूर्ण झाल्यावर रोख रक्कम आणि एटीएम कार्ड मशीनमधून बाहेर येताच ते घेणे गरजेचे आहे. अनेकदा लोक घाईत केवळ पैसे घेऊन कार्ड तिथेच विसरतात, ज्यामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
एटीएम मशिनचा कार्ड स्लॉट सैल असेल, किपॅडमध्ये काही शंकास्पद वस्तू अडकवलेली असेल किंवा मशीनमध्ये काही फेरफार केल्यासारखे वाटल्यास ते एटीएम वापरणे ताबडतोब टाळा. नाहीतर यामुळे तुमची फसवणूक होऊ शकते.
पैसे काढल्यानंतर स्क्रीनवर व्यवहार पूर्ण झालाअसा मेसेज आल्यावरच एटीएममधून बाहेर पडा.