Manasvi Choudhary
स्त्रियांना बांधणी साडी परिधान करायला आवडते. अनेक महिलांच्या वॉडरोबमध्ये बांधणीची एक तरी साडी असतेच.
बांधणी साडी गुजरात आणि राजस्थानचा हा वारसा कायमच फॅशनस्टाईलमध्ये ट्रेडिंगमध्ये असतो.
लग्नसमारंभात किंवा सणासुदीला पारंपारिक लूक म्हणून बांधणी साडी स्त्रिया नेसतात.
पारंपारिक बांधनी साडीमध्ये राजेशाही थाट येण्यासाठी खादी सिल्कचा वापर केला जातो. यामध्ये साडीवर मोठे काठ असतात.
बांधनीच्या नाजूक बुट्टीसोबत जेव्हा मिरर वर्क डिझाईन असते तेव्हा साडीचा लूक उठून दिसतो.
साडीचा मधला भाग हा पारंपारिक बांधनीचा असतो, पण तिचे काठ पाटोला डिझाइनचे असतात.
सॅटिनच्या मऊ कापडावर केलेली बांधनी आणि त्याला जोडलेली राजस्थानी 'गोटा पट्टी' ही फॅशन सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे.