Manasvi Choudhary
साडी ही महिलांचा पारंपारिक साज आहे. प्रत्येक महिलेला साडी नेसल्यावर त्यावर नटायला आवडते.
साडीच्या प्रकारानुसार ट्रेडिंग ज्वेलरी परिधान केल्या जातात. सध्या साडीवर बेल्ट लावण्याचा ट्रेंड सुरू आहे.
पूर्वीपासून महिला साडीवर कंबरपट्टा वापरतात. मात्र आता डिझाईन स्टाईलमध्ये अनेक साडी बेल्ट तुम्ही कॅरी करू शकता.
लग्न समारंभात नववधूसाठी साडी बेल्ट ही स्टाईल हटके दिसेल. तुम्ही साडीच्याच कापडाचा कॉन्ट्रास्ट बेल्ट शिवून घेऊ शकता.
काठपदरी किंवा पैठणी साडीवर तुम्ही सोनेरी रंगाचा नाजून कंबरपट्टा निवडू शकता.
इंडो-वेस्टर्न साडी लूकवर तुम्ही सोन्याच्या किंवा चांदीच्या रंगाचे पातळ मेटॅलिक बेल्ट वापरा. हे दिसायला अत्यंत आधुनिक आणि क्लासी वाटतात.
फॉर्मल किंवा प्रोफेशनल साडी लूकसाठी तुम्ही लेदर बेल्ट ट्राय करू शकता. ऑफिस पार्टी, ऑफिस मिटींग , इव्हेंट्स यासाठी हा लूक बेस्ट असेल .